माणुसकीच्या नात्याने सफाई कर्मचाऱ्यांसोबत दीपावलीचा आनंदोत्सव नगराध्यक्ष आश्लेषा आर. आर. पाटील यांच्या हस्ते किराणा किट व साडी-चोळीचे वाटप

प्रतिनिधी | सहारा न्यूज
नगरपरिषदेच्या वतीने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्ष आश्लेषा आर. आर. पाटील यांनी दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला. या निमित्ताने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून किराणा किट आणि साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.
शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कार्य अनमोल असून, त्यांच्या मेहनतीचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद फुलावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. “सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे, हीच खरी दिवाळी आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी नगराध्यक्ष आश्लेषा आर. आर. पाटील यांनी सर्व सफाई कर्मचारी बांधवांना व भगिनींना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या सणात मिळालेल्या या आपुलकीच्या भेटीमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *