Headlines

मुस्लिम सेवा संघ (शिक्षण व इतर कर्मचारी विभाग) हिंगोली जिल्हा कार्यकारणी जाहीर; विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

हिंगोली (विशेष प्रतिनिधी):
मुस्लिम सेवा संघाच्या ‘शिक्षण व इतर कर्मचारी विभाग’ अंतर्गत हिंगोली जिल्हा कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षण, कर्मचारी हित आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारणीच्या घोषणेवेळी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मासूमदार, राज्य अध्यक्ष मुमताज मॅडम, मराठवाडा अध्यक्ष शेख मुसद्दिक सर, मराठवाडा उपाध्यक्ष सोहेल सर तसेच कला, क्रीडा व सांस्कृतिक विभाग राज्य अध्यक्ष शोभा कदम यांचा समावेश आहे.
नवनियुक्त जिल्हा व तालुका पदाधिकारी:
* जिल्हा सल्लागार: डॉ. सरफराज खान
* जिल्हा उपाध्यक्ष: पठाण साजिद खान
* जिल्हा सचिव: इंजी. मोहिबुर रहमान
* जिल्हा सहसचिव: ॲड. अझहर खान
* कळमनुरी तालुका अध्यक्ष: मो. शफीक बागवान
* कळमनुरी तालुका उपाध्यक्ष: पठाण वाजेद अली खान
* कळमनुरी शहर अध्यक्ष: पठाण नवीद खान
* कळमनुरी शहर उपाध्यक्ष: इंजी. फारुकी मोहम्मद फारुख
* वसमत तालुका अध्यक्ष: शेख अख्तर हुसेन
कार्यकारणी सदस्य:
* ॲड. फय्याजोद्दीन
* मोहम्मद रुकनोद्दीन
* शेख मोइनोद्दीन
* पठाण सादिक अली खान
मुस्लिम सेवा संघ शिक्षण विभाग हिंगोलीचे जिल्हा अध्यक्ष सय्यद अतहर अली यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “एकता हीच आमची ताकद, शिक्षण ही आमची ओळख आणि समाजसेवा हेच आमचे मुख्य उद्दिष्ट” या भावनेतून संघटना शिक्षण व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व कर्मचारी संघटनांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *