हिंगोली (जिल्हा प्रतिनिध) :- मुस्लिम सेवा संघाच्या शिक्षण व इतर कर्मचारी विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी शेख मुसद्दीक सर यांची तर याच विभागाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी सय्यद अथहर अली सर यांची निवड करण्यात आली आहे. मुस्लिम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मासुलदार आणि शिक्षण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाम कुद्दुस सर यांच्या आदेशानुसार, मुस्लिम सेवा संघ शिक्षण व इतर कर्मचारी विभागाच्या प्रदेशाध्यक्षा मुमताज मॅडम यांनी ही अधिकृत नियुक्ती केली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मुस्लिम सेवा संघ हिंगोली जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदर निवडीचे स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाज़ीम रजवी, शहराध्यक्ष आवेज पठाण, ॲड. तुषार पवार, तौकीर नाईक, शोएब बागवान आणि रुद्रा सवने यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याप्रसंगी मुस्लिम सेवा संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शेख आमेर, जिल्हा सल्लागार तथा माजी नगराध्यक्ष मोहम्मद रफीक, जिल्हा सचिव मुजीब पठाण, शेख अयुब, जिल्हा उपाध्यक्ष एहसान सिद्दीकी, तालुकाध्यक्ष मोहम्मद रफीक, युवा तालुकाध्यक्ष शारेक रजा, सादेक पठाण, गफ्फार कुरेशी, अलीम कुरेशी, आमेर नाईक आणि जावेद अहमद यांच्यासह मुस्लिम सेवा संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. सर्वांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वात संघटनेचे काम अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.