आज दिं.20 ऑगस्ट रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भारताच्या विकासाला आधुनिक व सर्वसमावेशक दिशा देणारे, पंचायत राज व्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे जनक, भारताचे सर्वात तरुण माजी पंतप्रधान भारतरत्न “स्व.राजीवजी गांधी” यांना 82 व्या जयंती दिनानिमित्त स्व.राजिवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिंगोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतिश पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशआप्पा सराफ, हिंगोली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बंटी नागरे, जेष्ठ नेते बाजीराव इंगोले पाटील, भिमशक्तीचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, आदिवासी काँग्रेस सेलचे कळमनुरी तालुकाध्यक्ष बबन डुकरे, नामदेवराव बुद्रुक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव जुबेर मामु, चेतन उबाळे, वाजीद बेग, अनुप नायक, शेख अमन, अतुल नायक, विक्रम कंठाळे, राहुल चाटसे, शेख इरफान शेख शिकुर, सचिन साळवे यांच्यासह काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या 82 व्या जयंती दिनानिमित्त हिंगोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन..*