खर्गे यांच्या अपमानाचा हिंगोलीत तीव्र निषेध: काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने भाजप आणि RSS विरुद्ध धडक मोर्चा

हिंगोली (विशेष प्रतिनिधी, सहारा न्यूज):
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुनजी खर्गे यांच्या हल्द्वानी (उत्तराखंड) येथील सभेनंतर भाजप, RSS व मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी त्या जागेचे गंगाजल शिंपडून ‘शुद्धीकरण’ केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी आज, १४ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने भाजप आणि RSS संघाविरोधात तीव्र निषेध आंदोलन करत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
शिवछत्रपतींच्या पुतळ्यापासून रॅलीस सुरुवात
आंदोलनाची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून झाली. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप, RSS आणि मनुवादी विचारसरणीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या निषेध आंदोलनात काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने:
* डॉ. सतिश पाचपुते (जिल्हाध्यक्ष, हिंगोली जिल्हा काँग्रेस)
* जक्की कुरेशी (प्रदेश प्रतिनिधी, काँग्रेस)
* प्रा. साहेबराव देवकते (प्रदेश सचिव)
* सुरेशआप्पा सराफ (माजी जिल्हाध्यक्ष)
* मिलिंद उबाळे (शहराध्यक्ष, हिंगोली शहर काँग्रेस)
* डॉ. रमेश शिंदे (शेतकरी नेते)
* एकनाथ शिंदे (जिल्हाध्यक्ष, किसान काँग्रेस)
* बंटी नागरे (प्रदेश सचिव, युवक काँग्रेस)
* भगवान खंदारे (जिल्हा उपाध्यक्ष)
* विशाल इंगोले (युवक जिल्हाध्यक्ष, भिमशक्ती)
* दत्तराव कदम (तालुका अध्यक्ष, कळमनुरी)
* ॲड. प्रदिप पोले (तालुका अध्यक्ष, औंढा)
* बाजीराव इंगोले (ज्येष्ठ नेते)
* जुबेर मामु (जिल्हा महासचिव)
* सुदामराव खंदारे (जिल्हाध्यक्ष, सेवादल)
तसेच बापुराव पाटील वडदकर, भास्कर पोले, चेतन उबाळे, वाजीद बेग, शेख अजिम, अतुल नायक, विठ्ठल मोहनकर, राहुल चाटसे, बबन डुकरे, किसन जुमडे, किशन आडे, दत्तराव कडतीकर, राहुल घोडके, रुपेश लोकडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षकांना निवेदन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांमार्फत संबंधित घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करणारे निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *