Headlines

व्हॉइस ऑफ मीडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर विजय चोरडिया प्रदेशाध्यक्ष; अजितदादा कुंकलोळ व नरेंद्र देशमुख विभागीय प्रदेशाध्यक्ष

मुंबई | प्रतिनिधी

व्हॉईस ऑफ मीडिया,व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अनुभवी व नवोदित पदाधिकाऱ्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग आणि जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली असून अजितदादा कुंकलोळ यांची उत्तर-दक्षिण विभागीय प्रदेशाध्यक्ष, तर नरेंद्र देशमुख यांची पूर्व-पश्चिम विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी मिलिंद टोके आणि महेश पांचाळ, राज्य सरचिटणीसपदी गजानन देशमुख व सचिन मोहिते, राज्य उपाध्यक्षपदी संगम कोटलवार, चंद्रशेखर भोयर, अभिजीत दरेकर आणि गणेश जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य संघटक म्हणून लक्ष्मण बगाडे, राहुल धोका, जयेश काटे आणि इर्शाद शेख यांची निवड करण्यात आली आहे. कार्यवाहक म्हणून तानाजी घोडके, वैभव मोहिते, अमित बागडे, संजय तीपाले, राजू कापसे, गजानन बाजारे, अशोक मिश्रा, मुकुंद जोशी, अनिल चव्हाण आणि रखमाजी सुपारे यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवक्तेपदी नरेश पाटील, प्रमोद पानबुडे, रुपेश जाधव आणि आशिष शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून खजिनदार म्हणून गायत्री ढवळे आणि परेश राऊत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सहसंघटक म्हणून अहमद नूर, सुरेश जगताप, समीर माडेश्वर आणि अनिल करंदकर, सहसरचिटणीस म्हणून प्रशांत गोडसे, धनंजय कपाले, गुरुदास गुरुमुळे आणि ओंकार हिंगमिरे, तर सहकार्यवाहक म्हणून मलिकार्जुन धारूरकर, दीपक ढवळे, अरुण मोडक आणि शेख लाल शेख यांची निवड करण्यात आली आहे. राज्य संयोजक म्हणून गोरक्षनाथ नेहे, ॲड. नीतू विश्वकर्मा, राकेश कलाल, रियाज मुल्ला, संजय घेवारे, सोमनाथ पवार, महेंद्र पवार, मनोज कामंडी, संतोष चराटे आणि अब्दुल आतिक यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

नवीन कार्यकारिणीत राज्यातील सर्व विभाग व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी ही टीम कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया म्हणाले, “पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, घरकुल, अद्ययावत तंत्रज्ञान, पेन्शन, अधिस्वीकृती तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया राज्यभर संघटित आणि प्रभावी लढा उभारेल. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय असेल.”

उत्तर-दक्षिण विभागीय प्रदेशाध्यक्ष अजितदादा कुंकलोळ म्हणाले, “उत्तर-दक्षिण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. पत्रकारांचे स्थानिक प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी मजबूत संघटन उभी करत सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करू. व्हॉइस ऑफ मीडियाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

पूर्व-पश्चिम विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख म्हणाले, “पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. पत्रकारांचे हक्क, सुरक्षा आणि सामाजिक सन्मान यासाठी विभागीय स्तरावर सक्षम संघटन उभारून प्रत्येक जिल्ह्याशी समन्वय साधला जाईल.”

राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के म्हणाले, “मुंबई येथे जाहीर करण्यात आलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य कार्यकारिणीचे मी मनापासून स्वागत करतो. ही कार्यकारिणी निवडताना सर्व विभाग आणि जिल्ह्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बहुतांश पदाधिकारी हे नवे असून नव्या उत्साहाने महाराष्ट्रभर संघटन बळकट करण्यासाठी आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी ही टीम निश्चितच यशस्वी ठरेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *