**नांदेड:**
जिल्हाधिकारी कार्यालयाने सन २०२६ या वर्षासाठी नांदेड जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत.
**कोणत्या दिवशी आहेत सुट्ट्या?**
खालीलप्रमाणे २०२६ वर्षातील तीन सणांच्या निमित्ताने स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत:
| अ.क्र. | सणाचे नाव | दिनांक | वार |
|—|—|—|—|
| ०१ | हजरत हाजी सय्यद सरवरे मकदूम बडी दर्गा उर्स | ०६/०१/२०२६ | मंगळवार |
| ०२ | रक्षाबंधन | २८/०८/२०२६ | शुक्रवार |
| ०३ | ज्येष्ठा गौरी पूजन | १८/०९/२०२६ | शुक्रवार |
**कोणाला लागू आहेत सुट्ट्या?**
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, या स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांना लागू राहतील.
**कोणाला लागू नाहीत?**
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.