कळमनुरी भारत सरकारचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी २० जुलै २०२६ रोजी लाखो विद्यार्थ्यांनी संसद भवनावर मोर्चा काढला होता त्यावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करून अश्रुधुरांच्या नळकांड्या टाकून हजारो विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून जखमी केले, या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक २३ जुलै २०२६ रोजी कळमनुरी वकील संघाच्या वतीने महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री.किन्होळकर यांच्यामार्फत निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या की दिल्ली मोर्चातील विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशा मार्फत चौकशी करून दोषीं अधिकाऱ्यांना निलंबित करावे, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) बरखास्त करावी, मेडिकल प्रवेश परीक्षा (नीट)-२०२६ पेपर फुटी व निकालातील घोटाळ्यांची पारदर्शक चौकशी करावी, मेडिकल व इंजिनिअरिंगची परीक्षा राज्यस्तरावरच घ्यावी, नीट परीक्षा घोटाळ्यामुळे ज्या २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना एक करोड रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे ,शिक्षणाचे खाजगीकरण बंद करावे या मागण्या करण्यात आल्या.
कळमनुरी वकील संघाच्या सदस्यांनी न्यायालय परिसरातून उपविभागीय कार्यालयावर जात “पोलीस लाठीचार्ज नही चलेगा!”, “मोदी सरकार मुर्दाबाद!”, “मोदी जब जब डरता है पोलीस को आगे करता है!“, “धर्म की लढाई झुठी है देश की जनता भुखी है!” “इन्कलाब जिंदाबाद!”* *”जय भीम जय भीम जय बिरसा!” *”डॉ.बाबासाहेब आंबेडकर शहीद भगतसिंग महात्मा गांधी यांचा विजय असो!”“वकील-विद्यार्थी एकजुटीचा विजय असो!* अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात कळमनुरी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.इफ्तेखार नाईक, उपाध्यक्ष ॲड.सुनील घोंगडे,सचिव अँड.प्रभाकर मोरे, माजी अध्यक्ष ॲड.रवि शिंदे, ॲड.मोहम्मद इकबाल,अँड.के.पी. जोंधळे, ॲड.अझरुद्दीन कादरी, ॲड.शाकेर सिद्दिकी , ॲड. इलियास नाईक, अँड.लुगडे पाटील,ॲड.डी.एस.पाईकराव, ॲड.एल.एल.सिरसाट,ॲड.एस.टी. नरवाडे, ॲड.जे.आर.जाधव, ॲड.जी.एम.नागरे,अँड.अविनाश काळे,अँड.डी.पी.जाधव, अँड.मल्हारी खोकले,ॲड.कुणाल इंगोले,ॲड.अझर पठाण, ॲड.गुणरत्न पतंगे,ॲड.महेंद्र खिल्लारे,ॲड.धम्मानंद सोनुले, ॲड.शेख शकील,अँड.बुद्धरत्न बलखंडे,ॲड.पि.के.तडस, ॲड.एस.एम.अली,ॲड.झिशान नाईक आदी सामील होते