**शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ पेयाच्या विक्रीवर बंदी; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रशासनाला मोठे निर्देश**
**कळमनुरी** राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळांच्या ५०० मीटर परिसरामध्ये ‘स्टिंग’ (Sting) या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात यावी, असे कडक निर्देश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. मागील काही काळापासून शाळकरी मुलांमध्ये या पेयाचे प्रचंड आकर्षण वाढले असून, याच्या अतिसेवनामुळे…