हिंगोली जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’; नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा!
* कमी उंचीच्या पुलांवरून धोकादायक प्रवास टाळण्याचे आवाहन. * सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण. हिंगोली | सहारा न्यूज नेटवर्क (Saharanews.in): प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या ताज्या हवामान सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची तीव्र शक्यता वर्तविण्यात…