Headlines

    BLO आणि BLO सुपरवायझरसाठी मोठी बातमी! ‘SIR’च्या कामासाठी ६,००० रुपयांचे अतिरिक्त मानधन मंजूर; शासन निर्णय जारी

    मुंबई
    * नियमित मानधनाव्यतिरिक्त मिळणार ६,००० रुपयांचे एकवेळचे मानधन
    * २०२६-२७ च्या मंजूर अर्थसंकल्पातून होणार खर्च
    * घराघरात मतदार पडताळणी व डिजिटायझेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट फायदा
    विशेष प्रतिनिधी | सहारा न्यूज डॉट इन (Saharanews.in)
    निवडणूक कामात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बीएलओ (BLO) आणि बीएलओ सुपरवायझर (BLO Supervisor) यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘एसआयआर’ (SIR) चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता प्रत्येकी ६,००० रुपये एकवेळचे मानधन मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) सरकारने आज जारी केला आहे.
    नियमित मानधनाव्यतिरिक्त मिळणार रक्कम
    सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ६,००० रुपयांचे मानधन बीएलओ व सुपरवायझरना मिळणाऱ्या नियमित मानधनाव्यतिरिक्त (अतिरिक्त) दिले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक कामाचा ताण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळणार आहे. या विशेष मानधनाचा संपूर्ण खर्च २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या मंजूर अर्थसंकल्पातून केला जाणार आहे.
    ‘या’ कामांसाठी मिळणार विशेष लाभ
    मतदार याद्या अद्ययावत करताना कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करावे लागते. यामध्ये खालील प्रमुख कामांचा समावेश आहे:
    * घराघरात जाऊन मतदार पडताळणी करणे (House-to-House Voter Verification)
    * नवीन व दुरुस्तीचे फॉर्म संकलित करणे (Form Collection)
    * संकलित माहितीचे सिस्टिमवर डिजिटायझेशन करणे (Digitization)
    ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करणाऱ्या बीएलओ आणि सुपरवायझरना या ६ हजार रुपयांच्या एकवेळच्या मानधनाचा थेट लाभ मिळणार आहे.
    कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
    निवडणुकीशी संबंधित कामे करताना बीएलओ कर्मचाऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर सरकारने आज जीआर काढून आर्थिक मदतीची घोषणा केल्यामुळे राज्यभरातील बीएलओ आणि बीएलओ सुपरवायझर्समध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *