आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात शिक्षकांचा एल्गार; ‘आधी निवास, मग मुख्यालयाची सक्ती’चा निर्धार
(विशेष प्रतिनिधी, Saharanews.in): ग्रामीण भागातील शिक्षकांना मूलभूत निवासाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून न देता, केवळ मुख्यालयी राहण्याची सक्ती करणाऱ्या प्रशासकीय भूमिकेविरोधात गंगापूर तालुक्यातील शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात मुख्यालयाच्या प्रश्नावरून शिक्षक संघटनांमध्ये अभूतपूर्व एकजूट झाली असून, मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व शिक्षक सामूहिक रजा काढून भव्य मोर्चा व धरणे…