**टीईटी पेपरफुटीनंतर आमदार सत्यजित तांबे यांची संतप्त प्रतिक्रिया; २०-३० वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना परीक्षेची सक्ती का?**
**विशेष प्रतिनिधी, SaharaNews.in** **मुंबई:** टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटीच्या प्रकरणाने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि सध्याच्या परीक्षा पद्धतीवर काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “टीईटी परीक्षेला आमचा मुळीच विरोध नाही, पण २०-३० वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांनाही नव्या उमेदवारांप्रमाणेच पुन्हा पात्रता…