ओला कंपनीचा मुजोर कारभार: ६ महिन्यांपासून गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये धूळ खात; चौकशीसाठी फोन केला तर अधिकारी म्हणतात, ‘नो रिस्पॉन्स’!
**परभणी / हिंगोली (विशेष प्रतिनिधी, saharanews.in):** ग्राहकांना नवनवीन तंत्रज्ञानाची रंगीत स्वप्ने दाखवून कोट्यवधी रुपयांची इलेक्ट्रिक वाहने विकणाऱ्या ‘ओला’ (Ola Electric) कंपनीचा अत्यंत संतापजनक, बेजबाबदार आणि ग्राहकांची छळवणूक करणारा कारभार परभणीत समोर आला आहे. गाडी खरेदी केल्यावर अवघ्या काही महिन्यांतच तीत तांत्रिक बिघाड झाला. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल ६ महिन्यांहून अधिक काळ उलटूनही कंपनी गाडी दुरुस्त…