**हिंगोली जिल्ह्यात खतांचा तुटवडा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे मोठे पाऊल; ८६८ मेट्रिक टन युरिया व डीएपी खताचा बफर स्टॉक वितरित करण्यास मंजुरी** * **जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश; तालुकानिहाय होणार तातडीने वितरण** * **शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी आधारकार्ड बंधनकारक; ई-पॉस मशीनद्वारे होणार विक्री**
**सहारा न्यूज नेटवर्क** ** **हिंगोली:** खरीप हंगाम २०२६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा भासू नये आणि वेळेत पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील संरक्षित (बफर) साठ्यातील एकूण **८६८ मेट्रिक टन** डीएपी व युरिया खताच्या तातडीने वितरणास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये **४९० मेट्रिक…