## **हिंगोलीकरांसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी तब्बल २६३ कोटींचा निधी मंजूर; अनुदान वाटप सुरू**
**विशेष प्रतिनिधी | saharanews.in** **हिंगोली:** आधुनिक शेतीकडे पाऊल टाकणाऱ्या राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता तब्बल **२६३.७२ कोटी रुपयांचा निधी** प्राप्त झाला आहे. सध्या प्रक्रियेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची (अदायगीची) कार्यवाही युद्धपातळीवर सुरू…