**वैजापूर पंचायत समितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा धडाका; घरकुलाच्या जिओ टॅगिंगसाठी १ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रंगेहाथ जेरबंद**
**वैजापूर, (प्रतिनिधी):** पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घराचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी, कामाची स्थळ पाहणी (जिओ टॅगिंग) करून फोटो अपलोड करण्याच्या मोबदल्यात १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका अभियंत्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. ही धडक कारवाई सोमवारी (२९ जून) दुपारी वैजापूर येथे करण्यात आली. या कारवाईमुळे पंचायत समिती वर्तुळात प्रचंड खळबळ…