ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार; संगीत क्षेत्रावर शोककळा
विशेष प्रतिनिधी (SaharaNews.In) मुंबई: भावसंगीतात आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मखमली, मधाळ स्वरांनी प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत असून, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. शासकीय इतमामात निरोप सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त…