**नांदेड-हिंगोली महामार्गावर प्रवाशांची उघड लूट! ६० किलोमीटरच्या आत दोन टोलनाक्यांवरून दुहेरी वसुली**
**हिंगोली / नांदेड:** राष्ट्रीय महामार्गावर दोन टोलनाक्यांमधील अंतर किमान ६० किलोमीटर असणे बंधनकारक असल्याचा नियम असताना, नांदेड-हिंगोली महामार्गावर या नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे उघडकीस आले आहे. या महामार्गावर ६० किलोमीटरपेक्षा कमी अंतर असतानाही दोन ठिकाणी टोल वसुली केली जात असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…