हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर भीषण अपघात: पिकअप आणि बुलेटच्या धडकेत दोन जि.प. शिक्षकांचा जागीच मृत्यू
हिंगोली: हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर सेनगाव शहराजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव पिकअप आणि बुलेट यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. गजानन पत्की आणि संतोष देसाई अशी या मृत शिक्षकांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत आणि त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे….