**’आधार’ ठरला आधार! हरवलेल्या मूकबधिर बालकाची कुटुंबाशी भेट; जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते बालकाला केले सुपूर्द**
**सहारा न्यूज प्रतिनिधी : अकोला** अकोला रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या आणि बोलता व ऐकता न येणाऱ्या (मूकबधिर) एका बालकाला त्याच्या कुटुंबाशी मिळवून देण्याची किमया ‘आधार’ कार्ड प्रणालीमुळे शक्य झाली आहे. तब्बल दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आज (१ जून) अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत या बालकाला त्याच्या कुटुंबाच्या सुपूर्द करण्यात आले. मुलाला पाहताच कुटुंबीयांच्या डोळ्यांतून…