*कळमनुरी तालुक्यात तलाठी कार्यालये थेट शहरात! गावात तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची मोठी बेजारी*
*कळमनुरी:* महसूल प्रशासनाचा कणा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘तलाठी’. मात्र, कळमनुरी तालुक्यातील अनेक तलाठ्यांनी आपापल्या सजेच्या (गावाच्या) ठिकाणी न थांबता थेट कळमनुरी शहरातच आपली कार्यालये थाटली आहेत. गावात तलाठी उपलब्ध नसल्यामुळे छोट्या-मोठ्या महसुली कामांसाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी नाहक हेलपाटे मारावे लागत असून, यामुळे शेतकऱ्यांची मोठी बेजारी होत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला…